छत्रपती शिवाजी महाराजांना स्मृतीदीनी अभिवादन...            रिपोर्टर: ०३ एप्रिल १६८० रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी जगाला कणभर मावळे घेऊन मनभर स्वराज्य कसे स्थापन केले जाते हे दाखवुन देणाऱ्या कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा आज स्मृतीदिन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उस्मानाबाद शहरात मराठा सेवा संघाचे शामकांत नाईकनवरे व जिजाऊ ब्रिगेडच्या रंजनाताई टिपे यांच्या हस्ते शिवरायांच्या मुर्तीला पुष्पहार घालुन अभिवादनाने साजरा करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई अंबुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, "ज्या राजाच्या कर्तुत्वाचा लखलखाट संपूर्ण जगभर आजच्या लोकशाहीच्या काळातही आदराने सांगीतला जातो म्हणजे ही गोष्ट सामान्य नाही. लोकशाहीत राजेशाही कधीच असु शकत नाही. पण छत्रपती शिवराय त्याला अपवाद आहेत. त्यांच्या कर्तुत्वाचा डोलारा प्रचंड उंचीचा असल्याने आजही त्यांचे स्थान प्रत्येक सजीव असणाऱ्या माणसांच्या काळजावर कोरले गेले आहे. एकवेळ या देशातील युवक परमेश्वरा समोर नतमस्तक होणार नाही, पण छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत, तर शामकांत नाईकनवरे यांनी सांगितले की शिवरायांच्या कर्तुत्वाची किमया म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या कातळ काळजाच्या शाईने सार्वभौम काळाच्या कपाळावर कोरला गेलेला अमीट शिलालेख होय. तर संभाजी ब्रिगेड उमरगा तालुकाध्यक्ष यांनी मनोगतातुन शिवरायांनी भुमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी मुठीत जीव घेऊन अठरापगड जनसमुहाला साथीला घेत न भुतो न भविष्यती स्वराज्य घडवणारे कुळवाडीभूषण बहुजनप्रतिपालक जगतवंद्य छत्रपती शिवाजी महाराज होय. अशा असामान्य कर्तबगीरी बजावणाऱ्या थोर महामानवाचा काही टिनपाट वृत्तीच्या स्वराज्यद्रोही मनुवाद्यांनी आजच्याच दिवशी कपटाने घात केला. त्या कपटी मंत्र्यांच्या व पेशवाईच्या वारसदारांनी शिवरायांना त्यांच्या मृत्यूनंतर सुध्दा सोडले नाही. म्हणून आता शिवरायांचे अनुयायी व त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणुन बहुजन समाजापर्यंत खरे शिवराय समजावून सांगत त्यांना यातुन बाहेर काढणे नितांत गरजेचे आहे...!!
     सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार शाहीर अनिलकुमार माने यांनी केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश मुंडे, तालुकाध्यक्ष प्रतापसिंह गरड, शहराध्यक्ष आदित्य देशमुख, उपाध्यक्ष रईस शेख, CSMB चे जिल्हाध्यक्ष समीर सय्यद, रवींद्र अंबुरे, शाहीर अनिल माने व त्यांचे सहकारी  यांच्यासह विविध कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या