बळीराजा सामुदायिक विवाह सोहळा भुमिपुत्रांच्या मनात सकारात्मकतेची नवी ज्योत जागवेल - रघुनाथराव कुचीक रिपोर्टर:कृषी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या बळीराजा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन प्रबोधन फाऊंडेशन , विवेक व्यासपीठ राजनंदिनी समूह इंदापूर  व दुष्काळ निवारण समन्वय समिती यांच्या वतीने बुधवार दिनांक २९ मे रोजी सायंकाळी ६वाजुन ४९ मिनिटांनी इंदापूर ता वाशी जि धाराशिव येथील नृसिंह सहकारी साखर कारखाना मैदानावर करण्यात आले आहे .आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुले मुली तसेच शेतकरी शेतमजूर यांच्या मनातील नैराश्य जाऊन त्यांच्या मनात सकारात्मकता जागवली जाईल त्यांना सर्वाथाने स्वावलंबी बनवले जाईल अश्या प्रकारे बळीराजा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन आहे असे प्रतिपादन  किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथराव कुचीक यांनी केले .
प्रबोधन फाऊंडेशन, विवेक व्यासपीठ , राजनंदिनी समूह इंदापूर , वृंदावन फाऊंडेशन व दुष्काळ निवारण समिती च्या वतीने बळीराजा सामुदायिक विवाह सोहळा पोस्टर अनावरण सोहळा व जलसंधारण विषयात काम करनाऱ्या मराठवाड्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकिचे  सावरकर स्मारक सभागृह डेक्कन पुणे आयोजन करण्यात आले होते . तरुणांच्या रोजगार निर्मिती कडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज असुन , किमान प्रत्येक तालुका पातळीवर रोजगार मेळावे आयोजित करून तरुणांच्या हाताला काम दिले तर त्यांच्यातील नैराश्य कमी होइल  याप्रसंगी पुढे बोलतांना कुचीक म्हणाले ..
दुष्काळ निवारण समिती च्या वतीने गोधन सार्वजनिक पाणवठा या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या कार्याबद्दल कुचीक यांनी गौरवोद्गार काढले ... याप्रसंगी अनिल पोलकर संचालक म्हाडा संभाजीनगर , दुष्काळ निवारण समिती चे कार्याध्यक्ष प्राचार्य dr खुशाल मुंडे , प्रा रवीकुमार जायभाये , राजेंद्र गपाट धाराशिव , सागर शिंदे , रामेश्वर मोरे , नंदकुमार खरसडे , अतुल बांगर प्रा अशोक जाधवर उमेश मडके इ मान्यवर उपस्थित होते ...
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात जलसंधारण ,  कृषी व दुष्काळ निवारण इ विषयावर काम करनारे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुष्काळ निवारण समिती चे सचिन पाटील यांनी केले तर आभार राजेंद्र गपाट यांनी मानले ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या