रिपोर्टर: देशातील सर्वात चर्चेचा आसलेला लोकसभा मतदार संघ म्हणून ओळख आसलेल्या वाराणसी मतदार संघातुन उस्मानाबादचे रहीवाशी आणि राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरूण निटूरे यांनी शुक्रवारी आपली उमेदवारी दाखल केली.वाराणसी येथे अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी प्रधानमंत्री नरेद्र मोदी सह 16 जनांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

देशाचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांचा मतदार संघ आणि सांप्रादायीकतेची राजधानी म्हणून वाराणसी शहराची देशात ओळख आहे.2014 साली नरेद्र मोदी मोठया मताधिक्यांने वाराणसी येथून निवडून आले होते.त्याच वाराणसी मधून उस्मानाबादचे अरूण निटूरे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.मराठवाडयातील शेतक—यांची आणि बेरोजगारांची काय आवस्था आहे हे नरेद्र मोदीसह बाहेरील राज्यातील लोकांना माहीत व्हावी आणि केंद्रातील सत्तेवर येणा—या सरकारने याकडे लक्ष दयावे यासाठी नरेद्र मोदी यांच्या मतदार संघात जावून आपली उमेदवारी दाखल केली आसल्याची माहीती अरूण निटूरे यांनी महाराष्ट्र लाईव्हशी बोलताना दिली.
0 टिप्पण्या