तलमोड येथील कार जळीत प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चोकशी : आर.राजा


 रिपोर्टर: दिनांक 21.04.2019 रोजी  उमरगा तालुक्यातील कराळी शिवारातील मोरया हॉटेलसमोर उमरगा ते तलमोड हायवे रोडवरील एका पुलाचे साईडला असलेल्या खड्डयात पेटलेल्या कारची माहिती मिळाल्याने सदर घटनास्थळी लागलीच पोलीस स्टेशन उमरगा येथील पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार महादेव वाघ पोलीस हवालदार गवळी, पोलीस नाईक शेख असे सरकारी जिपने चालक पोलीस हवालदार पाटील यांच्या सह गेले असता सदर ठिकाणी खड्डयात पेटलेल्या कारची पाहणी करित असताना तेथे जमलेल्या जमावाने अग्निशामक दलाची गाडी का आणली ? नाही तुम्ही येथे का आलात ? असे म्हणून पोलीसांना जमावातील लोकांनी शिवीगाळ  व धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला व पोलीस जिपची समोरील काच फोडून नुकसान केले व नंतर अग्निशामक दलाच्या गाडीचे चालक व फायरमन यांना शिवीगाळ व मारहान करुन अग्निशामक गाडी रस्त्याच्या खाली ढकलुन देवून पलटी करुन सदर गाडीचे नुकसान केले व त्यांच्या शासकीय कामात देखील अडथळा निर्माण केल्या संबंधीची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार महादेव वाघ यांनी जमावातील  गणेश संपतराव पाटील(मोरे),मारोती बळीराम जाधव,मनोहर माधव मुळे,गणेश बळीराम साळुंखे, सुधाकर रामजी भोसले,लहु जीवन साळुंखे       , सुभाष राठोड सर्व रा.तलमोड व दाबका येथील गायकवाड व त्यांचे इतर 25 ते 30 साथीदार लोक यांनी गैरकायादयाची मंडळी जमवुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या संबंधी पोलीस स्टेशन उमरगा येथे दिनांक 22.04.2019 रोजी वरिल आरोपीतांविरुध्द फिर्याद दिल्याने त्यांचेविरुध्द भादंविचे कलम 324,323,353,,143,147,148,149,504,332 सह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सदर गुन्हयातील  जगदीश शिवाजी मोरे वय 34 वर्षे,सुग्रीव सदाशिव मोरे वय 29 वर्षे ,श्रीराम उमाजी मोरे वय 37 वर्षे सर्व रा.तलमोड यांना दिनांक 25.04.2019 रोजी अटक करण्यात आली असुन तपास करण्यात येत आहे.
 दिनांक ( 25.04.2019 ) रोजी  अशोक दत्तु मोरे यांनी दिलेले निवेदन बाजुस प्रमाणे आहे. दिनांक 21.04.2019 रोजी झालेल्या अपघातात वरिल घडलेल्या अपघातात कार पेटली होती त्यामध्ये तलमोड गावातील तीन मुले होरपळुन मयत झाली व सदर घटनेवेळी गावकऱ्यांनी वारंवार फोन करुनही पोलीस व अग्निशामक दल वेळेवर न आल्याने अपघात ठिकाणी बाचाबाची झाली होती. “ या प्रकरणी दाखल गुन्हयातील आरोपींना अटक करण्यासाठी दिनांक 25.04.2019 रोजी पहाटे 2.30 वा.सु. पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस उपनिरीक्षक माने व इतर आठ पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत घरी येवून दार ठोठावुन उमरगा पोलीसांनी प्रत्येक घरात घुसून घराची झडती घेतली व बायामाणसांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली व पोलीस उपनिरीक्षक माने यांनी दत्तु गणपती मोरे यांना जोरात थप्पड मारली व ढकलुन दिल्याने ते बेशुध्द पडून मयत झाले आहेत. ” असा त्यांच्या निवेदनात मजकुर नमुद केला आहे.
 दत्तु गणपती मोरे वय 75 वर्षे रा.तलमोड ता.उमरगा जि.उस्मानाबाद यांच्या मृत्यु बाबत पोलीस स्टेशन उमरगा येथे अकस्मात मृत्युची नोंद दाखल झालेली आहे. अशोक दत्तु मोरे व तलमोड येथील गावकऱ्यांचे निवेदनाची  आर.राजा पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांनी दखल घेतली असुन या प्रकरणाची सखोल नि:पक्ष चौकशी करण्यासाठी उमरगा विभागातील अधिकारी वगळुन जिल्हयातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नेमणुक करुन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आर.राजा पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या