सात वर्षांपासून तहानलेल्या वाटसरूची सेवा:संजय वानखडे यांचा सामाजिक उपक्रम


बोरगाव मंजू:आकोला 
ग्रामीण भागात संध्यस्थितीत पाणीटंचाई  भीषण समस्या असताना एकी उष्णतेमुळे लाईलाई होत असतानाच वाटसरूची तहान भागविण्यासाठी गत सात वर्षापासून येथील ध्येय वेडे सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे वाटसरूची तहान भागवून माणुसकी जपतात हे विशेष.
सर्व सामान्य माणूस परिस्थिती बेताचीच परंतु  दरवर्षी येथील आठवडी बाजारात  बाजारकरु व तहानलेल्या वाटसरू साठी स्वखर्चाने थंड पाणी पाणपोई लावून सेवा करतात  या वर्षी सुद्धा मंगळवारी आठवडी बाजारात पाणपोई चे उदघाटन  उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विलास देशमुख हे होते प्रमुख उपस्थितीत जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष देविदास अंबुलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी माजी सभापती गंगाबाई धामोळे , माजी उपसभापती वामनराव तायडे, प.स. सदस्य नितीन म्हेसने , मुख्याध्यापक श्रीकृष्ण कुकडे, अशोक आप्पा बिडवे, न्यामत शहा, रामराव चोटमल , माजी प.स. सदस्य अशोक तायडे, मो.तालीब , आदी उपस्थित पाणपोई चे उदधाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आयोजक ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव संजय वानखडे यांनी केले आभार पत्रकार संतोष गवई यांनी केले या वेळी  मो.शारीक , संतोष चक्रनारायण , अजय वानखडे, सखाराम वानखडे, शाम पिपळकर ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या