तुळजापुरात राष्ट्रवादी, काँग्रेसची पदयात्रा हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग
रिपोर्टर: तुळजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील आणि काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांनी मंगळवारी पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले.

तुळजापूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील, काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर,  राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, नगराध्यक्ष बापूसाहेब कने, माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद गंगणे, युवक नेते विनोद गंगणे, तालुकाध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक पंडित जगदाळे, संतोष कदम, नारायण नन्नवरे, किशोर साठे, औदूंबर कदम, अविनाश गंगणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र इंगळे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ शिंदे, मनसे माजी जिल्हाप्रमुख अमर परमेश्वर, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस उत्तम अमृतराव, नगरसेवक राहुल खपले, युवक नेते उमेश भिसे, महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मंजुषा मगर, माजी नगराध्यक्ष जयश्री कंदले, नगरसेवक सुनील रोचकरी रणजीत इंगळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत कदम, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष संदीप गंगणे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या