तेरच्या बरोबरीने ढोकीतून महाआघाडीला मताधिक्य देणार: नारायण समुद्रे


रिपोर्टर: गेल्या 70 वर्षात काँग्रेसने काय केले हा विरोधी सेना-भाजपचा आरोप पूर्णपणे चुकीचा असून देशाचा, राज्याचा, जिल्ह्याच्या व आपल्या परिसराचा विकास फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच शक्य झाला आहे. त्यामुळे या शेतकरी विरोधी सेना-भाजपला सत्तेतून हाकलून देवून संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार देशात आणण्यासाठी आपले उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना बहुमताने निवडून द्यावे, असेही नारायण समुद्रे यांनी सांगितले.
तालुक्यातील ढोकी येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना तेरच्या बरोबरीने मताधिक्य देण्याचा संकल्प जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नारायण समुद्रे यांनी बोलून दाखवला.
या बैठकीस ढोकी व परिसरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राचा निधी खेचून आणण्यासाठी दिल्लीत सक्षम खासदार असणे आवश्यक आहे. गेल्या 15 वर्षातील माझे काम तुम्ही सर्व जाणता, त्यामुळे येत्या 18 तारखेला आपण मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन केले. उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी सेना उमेदवाराने तेरणेची वाट लावल्याने ढोकी व परिसराचे सारे अर्थकारण बिघडल्याचे सांगितले व तेरणेचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असे सांगितले. सध्या तेरणेचा विषय न्यायालयात असून तो मार्गी लागला की तेरणा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे. 
या बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष गफार काझी, गोविंद तिवारी, ढोकीचे सरपंच नाना चव्हाण, उपसरपंच अमोल समुद्रे, गोविंदराव देशमुख, पांडुरंग देशमुख, शाम महाराज, शकील काझी, आयुब पठाण, सुनील शिंदे, दत्ता तिवारी, अमर समुद्रे, नासिर शेख, अंकुश दाणे, पांडुरंग पाटील, विठ्ठल सोमाणी, माणिक औटे, इरफान कुरेशी, रणजित समुद्रे यांच्यासह गावातील काँग्रेस आयचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या