व्हायरल व्हिडीओ प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे राष्ट्रवादीची तक्रार: सेना उमेदवाराची नार्को टेस्ट करण्याची मागणी:रिपोर्टर: शिवसेनेचे उमेदवार प्रचारासाठी चुकीच्या मार्गाचा आवलंब करीत आसुन विकासाचे मुददे बाजुला ठेवून व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या क्लिपची सत्यता लोकांसमोर यावी यासाठी राष्ट्रवादी च्या वतीने सेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची नार्को टेस्ट करावी आशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. 
शिवसेनेत आयात विरूध्द निष्ठावंत शिवसैनिक, असा वाद उफाळला आहे. त्यातूनच समाजमाध्यमात एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. शिवसेना उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनीच चर्चेदरम्यान त्याचे चित्रीकरण केले असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसवर बेछुट आरोप करीत मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमातील या दोन्ही चित्रफितींची सत्यता तपासून योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण यादव यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले आहे.
मतदारांची सहानुभूती मिळावी याकरिता शिवसेनेच्या उमेदवाराने स्वतःचा व्हिडीओ व्हायरल करून राष्ट्रवादीवर बेछुट आरोप केले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराचे हे कृत्य निवडणुकीतील भ्रष्ट कृतीत मोडते. स्वतः असे भ्रष्ट कृत्य करून जिल्हा प्रशासनाकडे खोटी तक्रार दाखल करून माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवर जाणिवपूर्वक आरोप करून त्याला प्रसिध्दी दिली जात आहे. मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांचे प्रलंबित प्रश्न व विकासाच्या मुद्यावरून इतरत्र वळविण्यासाठी जाणिवपूर्वक हा खटाटोप केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.समाजमाध्यमात उपलब्ध असणारे दोन्ही व्हिडीओ फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून त्याबाबतचे अहवाल उपलब्ध करून घ्यावेत आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात यावी. आक्षेपार्ह भाषेत स्वपक्षीयांवर उडविलेले शिंतोडे आणि स्वतःच्या चुका झाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर बेछुट आरोप करीत सुटलेल्या सेना उमेदवाराची नार्को टेस्ट करणे योग्य राहील, असेही यादव यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या