15 लाखांचे फसवे आश्वासन देणारांना त्यांची जागा दाखवून द्या राणाजगजितसिंह पाटील:


केशेगावमधील युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

रिपोर्टर: मागील साडेचार वर्षांत आश्वासनांचा भडीमार करणार्‍या युती सरकारने जनतेला 15 लाखांचे फसवे आश्वासन दिले. केवळ बोलून लोकांची मते मागणार्‍यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
तालुक्यातील करजखेडा येथे रविवार, दि. 7 एप्रिल रोजी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना उमेदवार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. सरकारी नोकर्‍या मिळणे पूर्वीप्रमाणे सोपे ठेवले नाही. जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसीत केवळ उद्योजकांना प्रोत्साहन देवून या ठिकाणी उद्योग आणणे आणि रोजगार निर्माण करणे युती सरकारला जमले नाही. दुष्काळी भागातील गरजूंना रोजगार निर्मितीसाठी मोठा वाव असताना युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनी काम केले नाही. देशात आणि राज्यात सत्ता असतानाही जे पाहिजे ते सत्ताधार्‍यांनी न करता स्वतःचा विकास साधला, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी, सत्ताधार्‍यांनी उद्योग निर्मितीसाठी एक रूपयाही निधी दिला नाही. रोजगार निर्मितीसाठी कसलाही प्रयत्न शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनी केला नाही, मग अशा लोकांच्या पाठीशी लोकांनी का उभे रहावे, हा विचार करण्यासारखा प्रश्न असल्याचे सांगून आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना जनतेने यावेळी साथ द्यावी, असे आवाहन केले. यावेळी करजखेडा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


केशेगावमधील युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 तालुक्यातील केशेगावमधील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी गावचे उपसरपंच अमोल पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोळगे, गणेश कुंभार, राजेंद्र सातपुत, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर डोंगरे, सय्यद पटेल, आकील शेख, माणिक शिंदे, रतन कोळगे, भारत गवळी, हरी वाघे तसेच राष्ट्रवादी युवक शाखा पदाधीकार्‍यांची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी धनंजय जगताप, उपाध्यक्ष संभाजी सपाटे, सचिव श्रीधर पुरी, सहसचिव बालाजी शिंदे, कोषाध्यक्ष सतीश डोलारे, सदस्य समाधान देशमुख, शकील हारकरे, पांडूरंग काळे, संदीप राऊत, फिरोज हारकरे, समाधान शिंदे, संजय पैकेकर, सर्वांचे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाध्यक्ष युवक समन्वयक राजसिंहा राजेनिंबाळकर, भारत डोलार, अमित शिंदे, ़वक्ता प्रशिक्षण ज़िल्हा उपाध्यक्ष तुषार वाघमारे, युवक तालुका उपाध्यक्ष शाहरुख शेख, विजय घोगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या