जिल्हयात जमावबंदी चे कलम 144 लागू


               

उस्मानाबाद, लोकसभा निवडणूक प्रक्रिया सन 2019, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, उत्सव श्री राम नवमी जयंती, महावीर जयंती, महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, या काळात दहशतवादी करावयाची त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्याची आवश्यकता असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश लागू  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले हे आदेश दि.16 एप्रिल 2019 रोजीचे 00.05 ते दि.30 मे 2019 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत लागू राहतील. असे अपर जिल्हा दंडाधिकारी उस्मानाबाद यांनी आदेश लागू केले आहेत.

जिल्हयात कोणत्याही व्यक्तीला किरायाने/भाडयाने ठेवताना घरमालक/लॉज चालक धर्मदाय संस्था, विश्रामगृह, भक्तनिवास, धर्मशाळा चालक/मालक यांनी वास्तव्यास राहणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र व निवासाचा पत्ता याबाबत संबंधित पोलीस स्टेशन न देता भाडयाने/किरायाने ठेवण्यास मनाई करण्यात आले आहे. जिल्हयात कोणत्याही व्यक्तीला दुय्यमप्रती मोटार वाहनाच्या खरेदी – विक्री, जूने वाहन भंगार मध्ये खरेदी विक्रीबाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती न देता खरेदी विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे.आक्षेपार्ह सिडी/गाणे वाजविल्यामूळे जातीय/ धार्मीक तेढ निर्माण होणे शक्यता असल्याने जिल्हयात कोणत्याही कार्यक्रमात अथवा ठिकाणी आक्षेपार्ह सिडी/गाणी/संगीत वाजविल्यास मनाई करीत आहे.अवैद्य सिमकार्ड व विक्री करण्यास अवैद्य स्फोटक साठा बाळगण्यास मनाई करण्यात येत आहे. मागील एक महिन्यात विक्री केलेल्या सिमकार्डधारकांची माहिती सादर करणे बंधनकारक राहील.

सायबर कॅफे मालकास आपली ओळख पटविल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीस सायबर कॅफेचा वापर करण्यास मनाई करीत आहे. शोभेची दारु विना परवाना साठा तसेच ड्रोनचा विना परवाना वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी  उस्मानाबाद यांनी  कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या