शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांच्या उमेदवारीला उस्मानाबाद मतदार संघातुन पसंती:
रिपोर्टर: 1977 साली शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल सुरू करूण शिवसेनेशी एकनिष्ठ राहाणारे नेते म्हणुन बोरकर यांची महाराष्ट्रात संगळीकडे ओळख आ​हे. उदयोग जगताशी त्यांचे आसलेले संबंध कुठेतरी उस्मानाबाद सारख्या दुष्काळी जिल्हयाचा विकास करतील आशी आशा उस्मानाबाद जिल्हयातील लोकांच्या मनात आहे.त्यामुळे येणा—या 2019 च्या लोकसभा निवडनुकीचे उमेदवार शंकरराव बोरकर हे आसासवेत आशी उस्मानाबाद मतदार संघातुन मागणी होत आहे.उस्मानाबाद जिल्हयातील राजकारण्यांच्या कर्तव्यशुन्यतेमुळे भटकत फिरणारी बेरोजगार तरूणाई हे उस्मानाबाद येथिल राजकीय प्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि खासदार यांचे आपयश आहे.जिल्हात वाढलेली बेकारांची संख्या कमी करायची आसेल तर उदयोगाची उभारणी होणे गरजेचे आहे.प्रस्तापितासह इतर स्वार्स्थी राजकारण करणारांचा आजपर्यंत उस्मानाबाद साठी काहीच उपयोग झालेला नाही.जिल्हयातील तरूणांच्या हाताला जर काम देयचे आसेल तर जिल्हयात उदयोग उभारणी शिवाय पर्याय नाही.आणि जिल्हयात उदयोग उभारणीसाठी शंकरराव बोरकर यांचे नेहमीच प्रयत्न आसतात.पक्ष राजकारण बघण्यापेक्षा जिल्हयाचा विकास होणे गरजेचे आहे त्यामुळे विदयामान खासदार आमदारांना उस्मानाबाद जिल्हयातील जनता कंटाळलेली आहे. म्हणून जिल्हयाचा विकास डोळयासमोर ठेवून शिवसेनेच्या गोटातुन आणि सर्वसामान्याच्या मनातुन शंकरराव बोरकर हे लोकसभेसाठी योग्य उमेदवार आहेत आशा चर्चा संगळीकडे एैकायला मिळत आहेत. विकासात्मक व्यक्तीमत्व आणि पक्षाशी आसलेली एकनिष्ठता पहाता श्विसेनाला जर उस्मानाबादची जागा घालवायची नसेल तर बोरकर यांना उेमदवारी देयला पाहीजे आशी चर्चा उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील गावा गावामध्ये एैकला मिळत आहे.उस्मानाबाद जिल्हयातील शिवसैनिकांनी रविंद्र गायकवाड यांच्या नावाला विरोध केल्यानंतर उमेदवार कोन? आसा प्रश्न पडताच बोरकर यांच्या नावाची मागणी जिल्हयातुन जोर धरू लागली आहे.