लहुजी शक्ती सेनेचा नळदुर्ग येथे रास्ता रोको:फडनवीस सरकारचा निषेध:





रिपोर्टर: बीड जिल्ह्यातील केज तालुका येथील रहिवासी संजय ताकतोडे यांनी मातंग समाजाला अ ब क ड नुसार वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी दि ५ रोजी बिंदूसरा नदीमध्ये जलसमाधी घेतली आज तीन दिवस झाले तरी त्यांची अंत्यविधी झालेली नाही म्हणून फडणवीस सरकारचा निषेध म्हणून रास्तारोको करून तीव्र विरोध करत घोषणाबाजी केली यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत तीव्र शब्दांत व्यक्त केले
 त्यावेळी उपस्थित लहुजी शक्तीसेना तुळजापूर तालूका अध्यक्ष किसन देडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटोळे दलित युवकचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कांबळे लहुजी शक्तीसेना जिल्हा संघटक बाळू देडे तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष  लक्ष्मण गायकवाड अमोल सगट अजय गायकवाड नवनाथ काळे कु.आकांक्षा गायकवाड आशाताई पात्रे  सह अनेक महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत..