उस्मनाबाद मतदारसंघ भाजपला मागण्यासाठी जिल्हयातील भाजप सैनिक मुंबईमध्ये तळ ठोकून:

 संपादक महाराष्ट्र लाईव्ह:

उस्मनाबाद लोकसभा मतदारसंघ भाजपला मागण्यासाठी जिल्हयातील भाजप सैनिक मुंबईमध्ये तळ ठोकून बसले आहेत. परंतु जिल्हयामध्ये
ग्राउंड लेवल ची परिस्थिती पहाता.भाजपाची दाळ सिजण्याचे चिन्ह दिसत नाही.
गेली पाच वर्ष फक्त बॉनर लावून आणि एकमेकाचे वाढदिवस साजरे करूण भाजपाने वेळ घालवल्यामुळे उस्मानाबाद जिल्हयामध्ये पक्षाचे प्रभुत्व निर्माण करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी कमी पडले आहेत.सत्तेत आसलेल्या भाजप पक्षाला जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधेही आपले आस्तीत्व टिकवता आले नाही.आणि विकासाच्या बाबातीत कसलेच निवेजन नाही, भाजपाच्या जिल्हाप्रमुखासह जिल्हयात आसलेले सर्व पदाधिकारी हे आपली नियुक्ती कुठल्यातरी महामंडळावर करूण घेण्याच्या नादातच राहीले.
त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आडचीनी मात्र त्यानी दुर्लक्षीत केल्या. जिल्हयातील जनता भाजपाच्या कार्यपध्दतीवर नाराज आसुन मतदारसंघ भाजपाला जरी मिळाला तरी मत कशाच्या नावाने मागायचे हा प्रश्न त्याच्यासाठी कायम आहे.2015 साली केद्र सरकारने हाय पावर 13 सौरउर्जा प्रकल्प देशात वेगवेगळया ठिकानी देण्याचे घोषीत केले होते.13 पैकी एक प्रकल्प उस्मानाबाद येथे येवू शकत आसताना फक्त जिल्हयातील खासदारांनी आणि भाजपाच्या पदाधिका—यांनी मागणी न केल्याने तो प्रकल्प उस्मानाबाद ला येवू शकला नाही.उस्मानाबाद जिल्हयात भाजपाच्या काळात बेकारी कमी होईल आशी आशा लोकांना होती.परंतू परिस्थिती उलट झाल्याने जिल्हयातील जनता आनेक प्रश्नांना तोंड देत आहे.आज ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर आसताना त्याकडे सत्ताधारी पक्ष या नात्याने भाजपाने पाठ फिरवली आहे.भाजपाच्या जिल्हयातील पदाधिका—यांनी वेगवेगळया प्रकारच्या डिलरशिप घेण्याबरोबर जनतेच्या प्रश्नाकडे सुध्दा लक्ष देणे गरजेचे होते.दुसरे महत्वाचे म्हणजे भाजप हा सत्तेतील पक्ष आसल्याने या दोन वर्षामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी भाजपात येणा—यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे काम शुन्य आणि बॉनर जास्त, आशी काहीशी स्थिती उस्मानाबाद मध्ये भाजपाची आहे.त्यातुनच गटातटाचे राजकारण तयार होताना दिसत आहे. या संगळया गोष्टी पहाता भाजपाला उस्मानाबाद मतदार संघ मिळणे म्हणजे.आश्चर्यच!म्हणावे लागेल.