गटबाजीच्या राजकरणात आखेर गायकवाड गटाची हार तर सावंत गटानी मारली बाजी : शिवसेनेची ओमराजे यांना उमेदवारी:संपादक महाराष्ट्र लाईव्ह:
उस्मानाबाद मध्ये शिवसेनेच्या गटातटाच्या राजकारणामुळे लांबनीवर पडललेली उमेदवाराची निवड आखेर आज जाहीर करण्यात आली.विदयमाना खासदार सोडुन सावंत गटाच्या ओमप्रकाशराजे निंबाळकर यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आसुन खासदार रवी गायकवाड यांचा गट नाराज झाल्याचे चित्र उस्मानाबाद जिल्हयात दिसत आहे.या घडलेल्या संगळया नाटयाचे परिनाम शिवसेनेच्या उमेदवारावर होणार का? आणि याला शिवसेचे उमेदवार कशाप्रकारे तोंड देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणूकीची प्रक्रीया सुरूवात होवून काही दिवस उलटुन गेले तरी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर होत नव्हते त्यामुळे मतदार संघामध्ये सेनेची उमेदवारी कोणाला मिळते याकडे संगळयाचे लक्ष होते.परंतु आज जाहीर झालेल्या ओमराजे यांच्या उमेदवारीमुळे.लोकांची उत्कंटा थांबली आहे परंतु विदयमान खासदार रवी गायकवाड यांचा गट सेनेच्या उमेदवारांचे काम करणार का? हा  प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे.शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्या दबाव तंत्रामुळे जरी ओमराजे यांना उमेदवारी मिळाली आसली तरी या उमेदवारीमुळे नाराज आसलेल्या गटाची तानाजी सावंत हे कशाप्रकारे मनधरणी करणार हे मात्र समजण्याचे पलिकडचे आहे. उस्मानाबाद मधुन रवी गायकवाड,ओमराजे निबांळकर,अनिल खोचरे,मकरंदराजे निबांळकर,शंकरराव बोरकर,यांची नावे चर्चेत होती.या पैकी मकरंदराजे निबाळकर आणि ओमराजे निबांळकर हे डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या घराण्याचे विरोधक आसल्याने त्यांनाच उमेदवारी जाईल आसे कयास बांधले जात होते.आगदी त्याप्रमाणेच डॉ.पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये ही लोकसभेची लढत होणार आसुन आगदी आटीतटीचा सामना पहायला मीळणार आहे. यामध्ये विदयमान खासदार रवी गायकवाड यांच्या नाराजीची फळे जर शिवसेनेला भोगावी लागली तर शिवसेनेच्या उमेदवारांचे भविष्य काय? आसु शकते हा मोठा प्रश्न आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या