रिपोर्टर: उस्मानाबद चे विदयमान खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्या ने संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्या नी उमरगा येथे एका बैठकी दरम्यान आंगावर रॉकेल ओतुन घेत आत्महात्या करण्याचा प्रयत्न केला.या वेळी बैठकीत उपस्थित आसलेल्या लोकांनी त्याची समजुत काढल्याने होणारा अनार्थ टळला गेला.
उस्मानाबाद मधुन सेनेची उमेदवारी ओमराजे निंबाळकर यांना मिळाल्यामुळे विदयमान खासदार गायकवाड यांचा गट चांगलाच नाराज झाला आहे.त्याच धरतीवर आज उमरगा येथे गायकवाड गटाच्या वतीने बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये आ.तानाजी सावंत आणि ओमराजे यांना सतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वाटेल ते बोलुन आणि शिव्या देवून आपला राग शांत केला तर गायकवाड यांना अपक्ष लढण्यासाठी सुध्दा यावेळी कार्यकर्त्याकडुन सांगण्यात आले. नाराज झालेले गायकवाड आपली अपक्ष उमेदवारी दाखल करणार का याकडे संगळयाचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या