आता नव्या व जुन्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट: बारकोड स्कॅन केल्यास वाहनांबाबतची संपूर्ण माहिती मिळणार:रिपोर्टर: एप्रिलपासून वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट- एचएसआरपी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.नव्याने तयार होणाऱ्या वाहनांना अशा प्रकारच्या नंबर प्लेट्स बसवल्या जाणार आहेत. तसेच लवकरच जुन्या वाहनांनाही अशा नंबर प्लेटसाठी सक्ती केली जाणार आहे. एप्रिलपासून अशाप्रकारच्या प्लेट्स नसतील तर वाहनाची नोंदणी होणार नाही.

 हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची वैशिष्ट्ये :

▪ नव्या वाहनांना लावण्यात येणाऱ्या पाट्यांवरील क्रमांक ‘हॉट स्टॅम्पिंग’द्वारे टाकण्यात येईल.
▪ अ‍ॅल्युमिनिअमपासून तयार केलेल्या या प्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम आहे.
▪ तसेच वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत ‘इंडिया’ असे  इंग्रजीत लिहिलेले असणार आहे.
▪ बारकोड आणि थ्रीडी होलोग्रामचाही या पाट्यांवर समावेश असेल. संबंधित बारकोड स्कॅन केल्यास वाहनांबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या