शंकराव बोरकर यांच्या निवडीमुळे उस्मानाबाद मतदारसंघातुन शिवसेनेला मिळणार बळ:


संपादक महाराष्ट्र लाईव्ह:

शंकरराव बोरकर यांची जिल्हासंपर्क प्रमुख म्हणुन झालेली निवड ही शिवसेने साठी महत्वाची मानली जात असुन जिल्हयात सेनेमध्ये झालेली गटबाजी पुन्हा सावरण्यासाठी बोरकर यांची महत्वाची भुमीका रहाणार आहे.त्याच बरोबर लोकसभेच्या निवडणूकीसाठी उस्मानाबाद जिल्हयासह पर्ण लोकसभा मतदार संघात बोरकर यांच्या माध्यमातुन सेनेला चांगले बळ मिळणार आहे.

शिवसेनेचे नेते शंकरराव बोरकर यांची उस्मानाबाद जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी निवड करूण त्यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख पदाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे बाळासाहबांचे शिवसैनिक अशी ओळख असलेले शंकरराव बोरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना रुजविण्याचे व वाढविण्याचे कार्य करीत होते , त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे . तसेच ते या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती व अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहेत.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ​सेनेच्या उमेदवारीसाठी निर्माण झालेली गटबाजी पाहुण लगेच मातोश्री वरूण शंकरराव बोरकर यांची संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.उस्मानाबाद जिल्हयामध्ये ओमराजे यांना उमेदवारी जाहीर होताच नाराज झालेला गायकवाड गट अतिशय आक्रमक झाल्याने शिवसेनेमधली गटबाजी आनखीनच बाढल्याचे दिसत आहे.या संगळया परिस्थिवर बोरबर यांची केलेली निवड काहीतरी जादु करेल आसे मत उस्मानाबाद मतदार संघातुन व्यक्त केले जात आहे. त्याच बरोबर लोकसभा मतदार संघातील बार्शी,औसा या तालुक्यासह उस्मानाबाद जिल्हयात आसलेले 4 लाख लिंगायत मतदान सेनेकडे ओळवण्यासाठी बोरकर यांची चांगली मदत होणार आसल्यामुळे सेनेच्या उमेदवाराला याचा चांगलाच फायदा होणार आसल्याचे बोलेले जात आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या