महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तुळजापूर शाखेच्या वतीने वित्त विभागातील कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांचा सत्कार


       उस्मानाबाद जि.प.च्या वित्त विभागातील कर्तव्यतत्पर  लेखा सहाय्यक राहूल थापडे व कनिष्ठ सहाय्यक प्रतिभा वडवले यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तुळजापूर शाखेच्या वतीने सन्माननीय वित्त व लेखा अधिकारी शेटे  यांचे हस्ते दि.1मार्च रोजी वित्त विभाग जि.प.उस्मानाबाद येथे सत्कार करण्यात आला.
    सन 2012 ते मे 2018 या कालावधीत 1नोव्हेंबर 2005 नंतरच्या नियुक्त कर्मचाऱ्यांच्या परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेनुसार पगारातून मासिक कपाती करण्यात आल्या होत्या.यामध्ये शासनाचे 10 टक्के अंशदान व ज्या त्या वर्षातील शासन नियमानुसारचे एकूण रक्कमेवरील जमा व्याज अशा प्रकारे एकत्रित रक्कमांचा हिशोब वित्तीय वर्षाखेरीस  कर्मचाऱ्यांना लिखीत स्वरुपात प्राप्त करुन देणे हे प्रशासकीयदृष्ट्या क्रमप्राप्त होते.परंतु कर्मचाऱ्यांच्या कपात रक्कमांचा संकलित हिशोब,शासनाचा समभाग,जमा व्याज व कपातीतील अनियमितता इ.बाबींमुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हिशोब अचूकरीत्या सादर करणे हे खूप मोठे दिव्य होते.व्यावहारिक व तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट बाबींवर मार्ग काढत वित्त विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करीत संकलित हिशोबाच्या स्लीपा तयार करुन कर्मचाऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर केला.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटननेही वेळोवेळी याबाबतीत पाठपुरावा करुन वित्त विभागास प्रशासनामार्फत योग्य ती माहिती पुरविण्याचा प्रयत्न केला.वित्त विभागाच्या या अथक कार्याबद्दल अनुबंध ठेवत आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तुळजापूर शाखेच्या वतीने उस्मानाबाद जि.प,च्या वित्त विभागातील थापडे व वडवले यांचा सन्माननीय वित्त व लेखाअधिकारी शेटे  यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वारुपात सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घेवारे यांच्यासह सुसेनसुरवसे,केशव काळे,बालासाहेब चिवडे,तुकाराम वाडकर,ज्योतिर्लिँग क्षीरसागर,शिंदे यांची उपस्थिती होती.