मुलाचा भाजपात प्रवेश करूण कॉग्रेस विजयी होण्यासाठी विखेंचे तुळजाभवानीला साकडे: हास्यास्पदसंपादक महाराष्ट्र लाईव्ह

दोन दिवसापुर्वी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधकृष्ण विखे पाटील याचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला.आणि महाराष्ट्रातील देव दर्शन करण्याची वेळ विखेंवर आली.कॉग्रेस ला मोठा विजय मीळावा म्हणुन विखें यांनी तुळजाभवानीला घातलेले साकडे ही विखें यांची कॉंग्रेस वरची दलबदलू निष्ठा वाटली.
आशा प्रकारच्या एकनिष्ठतेमुळे कुठल्याही माध्यमासमोर न बोलता विखेंनी आपले देवदर्शन चालु ठेवले आहे.काही दिवसावर आलेल्या लोकसभेच्या निवडनुका पहाता एखादया राष्ट्रीय पक्षाच्या विधीमंडळातील महत्वाच्या पदावर आसणारे प्रतिनिधी फक्त सत्तेसाठी आपल्यावर लोकांचा आलेला विश्वास कसकाय गहाण ठेवूू शकतात हीच चर्चा गेली दोन दिवस झाले,महाराष्ट्रभर चालु आहे. 
भाजपमध्ये गेलेल्या सुजय विखे पाटलांवर टीका करताना आपण हे देखील लक्षात घ्यायला हवे की राधाकृष्ण विखे पाटील 1995 साली शिवसेनेतून मंत्री झाले होते.सत्तेसाठी त्यांनी तेंव्हा शिवसेनेत प्रवेश केला होता आता पोरगा भाजपमध्ये जातोय, याचे नवल नाही.
परंतू महाराष्ट्रातील गावागावांत पक्षाच्या एकनिष्ठतेपाई काटया कुराडी घेवून लोक भाडंन करतात,त्यांना राधाकृष्ण विखे पाटील काय? सांगणार! कुठलाही अभ्यास नसताना फक्त पिडीजात वारसापोटी  मिळालेली ही राजकीय विरासत विखेंना संभाळता आली नाही असेच म्हणावे लागेल.घटनेच्या कलम 19 नुसार संगळयांनाच अभिव्यक्ती स्वतंत्र आहे परंतु त्या अभिव्यक्तीच्या माध्यमातुन केलेल्या कार्याचा जनतेला फायदा होणे गरजेचे आहे,कारण महाराष्ट्रातील जनता तुमच्याकडे एका वेगळया विश्वासाने पहात आली आहे.सर्वसामन्य जनतेला तुम्ही कोनत्याही पक्षात राहीलात तरी काही देनघेण नाही कारण जनता स्वभिमाने जगते,परंतु महाराष्ट्राच प्रतिनिधीत्व करणा—या विधीमंडळातील महत्वाच्या प्रतिनीधी ने जर आशा प्रकारची राजकीत थटटा केली तर ती सर्वसामान्याला ही सहन होणार नाही,आसेच वाटते.तुम्ही कीतीही माध्यमापासुन तोंड लपवुन फिरलात तरी एकना एक दिवस तुम्हचे सत्ताप्रेम महाराष्ट्रासमोर येणारच आहे.
ग्रामीण भागातील सोसायटी आणि ग्रामपंचायत च्या निवडुकीसाठी भंडनं करूण कोर्टात चकरा मानणा—या मित्रांनो मोठया लोकांचा काहीतरी अदर्श घ्या कमीत कमी काही नाही झाल तर वेळेवर पक्ष बदलायचे तरी शिखा!