
बोरगाव मंजू पोलिसांची कारवाई
रिपोर्टर: राष्ट्रीय महामार्गावर मूर्तीजापूर कडून अकोला कडे अवैधरीत्या एका मालवाहू गाडीतुन गुटखा जात असता बोरगाव मंजू पोलिसांनी सदर वहना सह गुटखा पकडून अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला ही कारवाई मंगळवारी दुपारी दरम्यान केली.
प्राप्त माहितीनुसार एका मालवाहू गाडीतून अवैधरीत्या प्रतिबंधक गुटखा मुर्तीजापुर कडून अकोला येथे जात असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली वरुन माहितीच्या आधारे सा.पो.अधिक्षक गोरख भांबरे , यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजीव राउत सह पोलीस कर्मचारी यांनी राष्ट्रीय महामार्गावर सदर वाहनावर पाळत ठेवून पिकप बोलेरो गाडी क्रमांक एम एच 27 1029 या वाहनास महामार्गावर बोरगाव मंजु नजिक थांबवून अधिक चौकशीदरम्यान अवैध गुटखा 30 बॅग किंमत सहा लाख रुपयांचा ऐवज आढळून आला. दरम्यान सदर वाहना सह एकुण किंमत अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करून अन्न व औषध प्रशासन विभागास पुढील कारवाई साठी माहिती दिली. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.