'सीए' परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

रिपोर्टर: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटन्टस्‌ ऑफ इंडिया' (आयसीएआय) यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

आयसीएआय'ने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 2 ते 17 मे दरम्यान होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे आता ही परीक्षा 27 मे ते 12 जून दरम्यान होणार आहे.
 परीक्षेच्या नव्या वेळापत्रकानुसार फाउंडेशन कोर्सची परीक्षा (नवी योजना) 4, 7, 9 आणि 11 जूनला होणार आहे
 फाउंडेशन कोर्स परीक्षेबरोबरच इंटरमिजिएट कोर्स, फायनल कोर्स आणि इंटरनॅशनल टॅक्‍सेशन अशा परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.icai.org या संकेतस्थळावर पाहता येणार