दिनांक ४ मार्च २०१९ रोजी माझ्या वाढदिवसा निमित्त विनम्र आवाहन करतो की,पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात जवळपास ४२ भारतीय जवान शहीद झाले आहेत ही घटना अत्यंत दुःखद असुन मनाला वेदना देणारी आहे.तसेच महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाई,चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे शेतकरी,कष्टकरी,शेतमजुर,कामगार अडचणीत आहेत अशा परिस्थितीत वाढदिवसानिमित्त कोणीही हार-तुरे, जाहीरातबाजी,पोस्टर किंवा अन्य वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेऊ नये अशी सर्वांना विनंती करतो या आधी आपण माझ्या आवाहनाला सहकार्य केलात यावेळी देखील विनम्र आवाहनाला सहकार्य करावे,ही विनंती