येडशी येथे भाजपाचे पदाधिकारी आसल्याचे सांगुन कामगार नोंदनीच्या नावखाली होतेय 2500 हाजाराची वसुली: कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन:रिपोर्टर: उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांच्या होत असलेल्या नोंदणीसाठी काही तोतया लोकांनी भाजपाचे पदाधिकारी आसल्याचे सांगुन कामगार लोकांकडुन नोंदनीसाठी 2500 हजार रूपये घेतल्याचे उघड झाल्यामुळे आर जी बांधकाम संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना
निवेदन देवून या भामटया लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.   
 जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी सुरू असून या नोंदनी मध्ये गैरप्रकार होत आसल्याने मूळ कामगार वंचित राहत आहेत.  गावांमध्ये जावून तुम्हाला ५००० रू मिळतील असे सांगून  नोंदनीसाठी २५०० हजार रुपये घेत आसल्याची माहीती मीळाली आहे.येडशी येथे दोन दिवसापुर्वी बोगस नोंदनीचे काम चालु आसताना काही लोकांना पकडण्यात आले होते.पकडलेल्या लोकांनी आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आसल्याने नोंदनी करत आहोत आसे सांगीतले होते. या नोंदनीचा बोगस कामगार लाभ घेत असून ग्रांमसेवक सुध्दा कामगाराची पडताळणी न करता ९० दिवसाचे प्रमाण पत्र देत आहेत तरी या दलालांचा सुळसुळाट थांबवावा अशी मागणी आर जी बांधकाम व असंघटीत कामगार संघटना यांनी जिल्हा अधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त उस्मानाबाद यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.यावेळी अध्यक्ष ऋषिकेश क्षिरसागर,कालीदास शिंदे, विशाल शिंदे, वैभव वाघमारे,शंकर गरड,पोपट पवार,गणेश चंदनशिवे, वंदना जानराव उपस्थित होते.