जि प घारगाव चा शिवजन्मोत्सव झाला लोकोउत्सव


परांडा; तालुक्यातील जि प प्रा शाळा घारगाव, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य असा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
आजपर्यंत दोन प्रबळ गटात ही शिवजयंती साजरी केली जात असे, यासाठी दोन्ही गटातून वारेमाप खर्च केला जात असे यातून कोणतेही समाज उपयोगी कार्य उभा राहत नव्हते. डीजे,इत्यादी गोष्टी वर जवळजवळ दीड लाख पर्यंत खर्च होत असे.यासाठी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक शशिकांत लटके,शालेय व्यवस्थापन समिती चे राहुल काकडे, नंदू लटके,सचिन सुरवसे, अमोल काळे, कुबेर सुरवसे,जनक सुरवसे, दीपक बापू लटके, ज्ञानू वाघमारे, हनुमंत प्रतापे, रामदास प्रतापे ,गोकुळ काळे सुहास करडे, निखिल काळे, व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांनी पुढाकार घेत संपूर्ण एकच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानिमित्ताने विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर घेण्याचे ठरले,
    या आव्हानाला प्रतिसाद देत युवक मंडळ यांनी अतिशय कमी खर्चात शिवजयंती साजरी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र येत भव्य अशी शिवजयंती उत्सव साजरा केला, यामध्ये शिवविचार घेऊन वैचारिक शिवजयंती साजरी केली.
   घोड्यावर बसलेले बाल शिवराय, जिजाऊ, येसूबाई, संभाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक इत्यादी महापुरुषाच्या वेशभूषेतील बाल चमू ,देवा श्री गणेशा,दैवत छत्रपती या गाण्यावर मुले व मुलींची लेझीम पथक , आबालवृद्ध चे वारकरी पथक, युवक वर्गाचे लेझीम पथक  या शोभा रॅलीचे आकर्षक ठरले. या रॅलीत मुस्लिम, धर्मीयासह सर्वच जाती-धर्मातील नागरिकांनी सहभाग घेतला.
   मनातील वाद नाहीसा होऊन सुसंवाद झाल्याने गावातील आबालवृद्ध यांच्या चेहऱ्यावर आंनद दिसून आला.
  शोभायात्रेचा शेवट सर्व गावकऱ्यांसह, युवक वर्ग, शिक्षक वर्ग यांनी एकत्र येत नाचत आंनद घेत झाला