रिपोर्टर रूपेश डोलारे :तुळजापूर विधानसभा आयोजित सी. एम. चषक स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा आज तुळजापूर येथे संपन्न झाला. यामध्ये एकूण ६ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवून मैदान गाजवले. यावेळी भाजपा युवा नेते रोहन देशमुख यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना रोख रक्कम, मुख्यमंत्री स्वाक्षरी प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ. सन्मानचिन्ह देवून ६५ जणांचा सत्कार करण्यात आला.

सदर स्पर्धेत १२ विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कुस्ती, नृत्य, चित्रकला, मैरेथॉन, कॅरम, गायन, रांगोळी, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट आदी खेळांचा समावेश होता. कार्यक्रमास रामदासअण्णा कोळगे, प्रभाकर मुळे, अनिल काळे, विजय शिंगाडे, दत्ता राजमाने, गुलचंद व्यवहारे, अर्जुन सदमा, सत्यवान सुरवसे, सुहास साळुंके, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व तुळजापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.