राष्ट्रवादीचे नेते अशोकराव जगदाळे यांच्या वतीने नळदुर्ग येथे आयोजित महिला मेळाव्यास महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद


जि.प.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती 

रिपोर्टर:  कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठान यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोकराव जगदाळे व त्यांच्या परिवाराने शहरातील महीलांसाठी मकर सक्रांती निमीत्त आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास शहरातील महीलांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून यावेळी सुमारे दोन हजार महीला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी जि.प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी महीलांशी थेट संवाद साधला. शिवाय यावेळी महीलांना आकर्षक बक्षीसे ही सोडत पध्दतीने सौ.अर्चनाताई पाटील यांचे हस्ते देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर श्री.अशोकराव जगदाळे, नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई जगदाळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थीत होत्या.

यावेळी लकी ड्रॉ पध्दतीने महीलांसाठी अकरा बक्षीसांची ड्रॉ काढण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीसे सौ. संगीता शुभम जाधव यांना सोन्याचे कर्णफुले मिळाले तर व्दितीय क्रमांक सौ अशा राजू देडे यांना चांदीचा कमरपटटा मिळाला तर तृतीय क्रमांक सौ सरोजा विकास भोसले यांना मिक्सर तर चौथा क्रमांक पार्वती तुकाराम सोनवणे यांना पैठणी तर पाचवा क्रमांक पार्वती राजेंद्र कांबळे यांना सोन्याची नथ, सहावा क्रमांक सिध्दवा लक्ष्मण सोमवसे यांना चांदीचा छल्ला, सातवा क्रमांक सौ. जयश्री तुकाराम पाटील यांना चांदीचा करंडा, आठवा क्रमांक सौ गंगाबाई तम्मा बंदीछोडे यांना वॉटर फिल्टर, नववा क्रमांक सौ. अरूणा सातपोते यांना तांब्याचे जग व ग्लास सेट, दहावा क्रमांक सौ. सारीका गायकवाड यांना मेकअप बॉक्स व अकरावा क्रमांक अंबिका कांबळे व भाग्यश्री श्रीकृष्ण कुलकर्णी यांना कुंतीवान व गांधारी वान मिळाले. सर्व बक्षीसे सौ. अर्चनाताई पाटील, सौ. अशाताई जगदाळे व नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई जगदाळे यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी सौ. मिलनताई नितीन कासार यांनी आपल्या भाषणातून प्रथमच उपस्थीत महीलांशी थेट संवाद साधून अशोक जगदाळे यांच्या सामाजिक कार्याची माहीती देत महीलांचे मनोरंजन ही केले.
दरम्यान कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्वच महीलांना संक्रातीचे वान म्हणून साडया भेट देण्यात आल्या.