उस्मानाबाद येथे राष्ट्रसंत श्री गाडगे महाराजांची जयंती उत्साहात साजरी:

उस्मानाबाद येथे राष्ट्रसंत संत गाडगे बाबा यांची १४३ वी जयंती गाडगे महाराज चौक शहर पोलीस स्टेशन जवळील चौकात साजरा करण्यात आली यावेळी संत गाडगे महाराजांच्या पुतळ्याचे पुजन उद्योजक देवदत्त मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र परीट सेवामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ शिंदे,बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे,नगरसेवक तथा न.प. गटनेते सोमनाथ गुरव,बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे सचिव लक्ष्मण माने,बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे कोषाध्यक्ष तथा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ सुरेखा काशिद यांच्या उपस्थित पुजन करण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नेताजी धोंगडे,युवाअध्यक्ष प्रशांत वाघमारे, नितिन शेरखाने,शिवानंद कथले,अमोल पेठे,अँड एम बी माडेकर,प्रमोद चव्हाण,बाळासाहेब राऊत,संदिप सरपाळे नाना घाडगे,आदिसह परिठ समाजातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.