कर्मवीर परिवारातर्फे रक्तदान शिबीर: महिलांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान अपंग कर्मचारी यांचाही सहभाग : शिक्षक महिलांनेही केले रक्तदान:

रिपोर्टर:  परांडा तालुक्यातील जवळा(नि)येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कर्मवीर परिवार परांडा यांच्या वतीने कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रशाला जवळा(नि)येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करून स्मृतिदिन "समाजदिन" म्हणून साजरा करण्यात आला. यामध्ये उत्स्फूर्तपणे 42 महिलांनी रक्तदान करीत रक्तदान चळवळ उभा केली. तालुक्यातील शिक्षक,गावातील युवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत 118 बाटल्यांचे रक्त संकलन केले. महिला शिक्षिका कल्याणी तांबे यांनी पुढाकार घेत महिला शिक्षिका, महिला, युवती यांनी रक्तदान केले. मुस्लिम महिलांचा विशेष सहभाग होता.बार्शी येथील श्रीराम रामभाई शहा रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.
       कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा नंदा घाडगे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्या चौधरी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे हे उपस्थित होते. यावेळी अनिल गवारे, अशोक गवारे,नाना कातुरे मैनुउद्दीन तांबोळी, सीमा गवारे, रमेश बारस्कर, दत्ता गरड, भागवत घोगरे, रामदास होरे,नागनाथ देशमुख आदी शिक्षक पदाधिकारी-यांची उपस्थिती होती.रक्तपेढीच्या वतीने डॉ गणपत मोरे, कपिल हिंगमिरे, पांडुरंग मांजरे, गणेश मांजरे, कृष्णा राऊत, दिपक डमरे यांनी रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासून रक्तदात्याची मदत केली.कर्मवीर परिवाराच्या वतीने रक्तदात्या महिलांना नॅपकिन तसेच रक्तदात्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर कातुरे, कल्याण तांबे, अमित येळवे, महादेव राऊत, भाग्यवान रोडगे, काकासाहेब गवारे,महादेव विटकर, शिवाजी वाघमारे, नागनाथ गटकळ, प्रशांत बरबडे, संतोष बरचे, राहुल अंधारे, मंगला चव्हाण, मैना बारकुल, नंदा चौघुले,दीपाली जगदाळे, सीमा गवारे, रतन मोरे, हिना खल्ली,मुनेरा खल्ली,शबाना खल्ली,नम्रता चौधरी, मंगला चव्हाण, वैद्य मॅडम व गावातील युवक,जि प के प्रा शा व प्रशाला येथील शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, कर्मवीर परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला.