पिताश्री रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने सारोळा येथे कीर्तन- भजन -वारकरी सन्मान कार्यक्रम


हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे कीर्तन

वारकरी सांप्रदायातील १७ जणांचा पुरस्काराने होणार सन्मान                                                                                                                  पुरस्काराचे वितरण 

                                                                                                    पिताश्री- मातोश्री पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन  


  

उस्मानाबाद: उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे हभप पिताश्री स्व. श्रीमंतराव तात्याजीराव रणदिवे व मातोश्री स्व. पद्मीनीदेवी श्रीमंतराव रणदिवे यांच्या पुण्यस्मरणार्थ  कीर्तन, भजन, वारकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे कीर्तन होणार असून वारकरी सांप्रदायातील योगदानाबद्दल १७ जणांना पिताश्री श्रीमंतराव रणदिवे वारकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . 
सारोळा येथे रविवार, दि. ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता किर्तनास प्रारंभ होणार आहे.  श्री व सौ पद्मीनीदेवी श्रीमंतराव रणदिवे दांम्पत्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त औसा (जि. लातूर) येथील श्री मल्लिनाथ महाराज संस्थानचे पीठाचार्य तथा श्रीक्षेत्र पंढपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे कीर्तन व भजन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात वारकरी सांप्रदायातील योगदान व अखंड सेवेबद्दल वारकरी सांप्रदायातील महतींचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये हभप संदीपान महाराज हासेगावकर, हभप प्रकाश बोधले महाराज, हभप नवनाथ महाराज चिखलीकर, हभप रघुनंदन महाराज तेरकर, हभप ज्ञानेश्वर महाराज अनसुर्डेकर, हभप महेश महाराज माकणीकर, हभप भारत महाराज धाराशिवकर, हभप रेड्डी महाराज तुळजापूरकर, हभप राम सुतार महाराज काजळेकर, हभप योगेश महाराज दारफळकर, हभप उंबरे महाराज वाणेवाडीकर, हभप वामन महाराज सकनेवाडीकर, हभप ललत लिंगे महाराज सारोळकर, हभप तात्या टिंगरे महाराज सारोळकर, हभप बबन मिटकरी महाराज सारोळकर, हभप देवगिरे महाराज सारोळकर, हभप रघुनाथ महाराज सारोळकर यांना पिताश्री श्रीमंतराव रणदिवे वारकरी सन्मान पुरस्कार देऊन हभप गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात येणार आहे. या कीर्तन, भजन, वारकरी सन्मान व अन्नदान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन  रणदिवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, प्रशांत रणदिवे व बलराज रणदिवे यांनी केले आहे.