रिपोर्टर: वा रस्ता सुरक्षा (अभियान) 2019 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,उस्मानाबाद व पोलीस विभाग, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने दि.04 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये सर्व जिल्हाभर राबविण्यात येत आहे.
या अभियानाचे उदघाटन समारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसर उस्मानाबाद येथे आज दि.4 फेब्रुवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी मा.श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली 30 वा रस्ता सुरक्षा (अभियान) संपन्न झाला.कार्यक्रमाचे उदघाटन आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील, पोलीस अधीक्षक श्री.आर.राजा,नगर परिषद अध्यक्ष श्री. मकरंद राजेनिंबाळकर, यांनी केले.
अध्यक्ष भाषणात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करतांना प्रत्येक दुचाकी स्वाराने हेलमेट वापरावे, कार चालकांनी सिटबेल्ट लावावेत, वाहतूकीच्या सर्व नियमाचे पालन करावे व अपघात होऊ नये म्हणून स्वत:दक्षता घ्यावी तसेच समोरच्या व्यक्तीच्या जीवास धोका निर्माण करू नये असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सुधीर पाटील, कार्यकारी अभियंता सा. बा.विभाग श्री. अनिल सगर जिल्हा शाल्यचिकित्सक डॉ. आर .व्ही गलांडे, पोलीस निरिक्षक वाहतूक शाखा धरमसिंग चव्हाण, अध्यक्ष उस्मानाबाद मोटार मालक संघ मैनुदीन पठाण तसेच परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास शासकीय आयुवैद महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गजानन नेरपगार,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी अपघाताची कारणे व त्यावरील उपाय,रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने घ्यायची काळजी व पाळावयाचे नियम या बाबीचा उल्लेख केला.तसेच रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती बाबत माहिती देण्यात आली
आर. राजा. पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भारतातील अपघातातील बळीची संख्या ही युध्दातील बळीपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना समुपदेशनाची गरज असल्याचे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांनी वाहतूकीचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष नगर परिषद,उस्मानाबाद यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राणाजगजितसिंह पाटील, आमदार उस्मानाबाद यांनी रस्ता अपघातात होणाऱ्या वाढत्या मृत्युंच्या संख्येबाबत चिंता व्यक्त करून वाहन चालवताना चालकास सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक असल्याचे नमुद केले.तसेच अपघातातील जखमीना वेळेवर वैद्यकीय उपचार देणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून आता मदत करणाऱ्या अपघात दुतास कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची गरज नसल्याचे उपस्थितांना सागितले.
शेवटी युनूस सय्यद वाहन निरिक्षक सर्व मान्यवराचे,विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थी वाहतूक संघटना व सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देशमुख यांनी केले.