मतिमंद प्रवर्गाची राज्यस्तरीय चॅम्पियनशिप पहिल्यांदाच उस्मानाबादला:






रिपोर्टर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांगाच्या अस्थिव्यंग/मतिमंद /मूकबधिर/अंध या चार प्रवर्गाच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा अमरावती येथील शासकीय क्रिडा संकुलनात दि. 01 ते 03 जानेवारी 2019 रोजी पार पडल्या मतिमंद प्रवर्गामधुन उस्मानाबादच्या तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगांव संच. स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, विमानतळ रोड, आळणी  या बालगृहातील मुलीनी 
 वयोगट 8  ते 12
कु.बंसती - 25 मी .(भरभर चालणे)  राज्यात प्रथम
 वयोगट 17   ते 21
 कु. भारती - बादली मध्ये बाॅल टाकणे - राज्यात प्रथम
 वयोगट 22 ते 25
 कु. पायल शेखु पाटिल - (25 मि. चालणे)  राज्यात प्रथम 
 08 ते 12 वयोगट
कु .रुपाली - (साॅप्ट जंप)
 राज्यात प्रथम
 वयोगट 13 ते16
 कु .भावेश्वरी (साॅफ्ट जंप व 100 मि.  रनिंग) राज्यात प्रथम
 वयोगट 17 ते 21
कु दुर्गा  (गोळा फेक)
 राज्यात तृतीय
वयोगट 22 ते  25
कु.पिंकी अंकुश शिंदे (गोळाफेक ) राज्यात प्रथम 
या क्रिडा प्रकारात राज्यस्तरीय  एकुण सात सुवर्ण व एक कास्य पदके मिळवुन उस्मानाबाद जिल्हाला राज्यस्तरीय थर्ड चॅम्पियनशिप मिळवुन दिली या क्रिडा स्पर्धेमध्ये 35 जिल्ह्य़ातील मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी व राज्यातील 14 मतिमंद बालगृहातील मुला मुलींनी सहभाग नोंदविलेला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांगाच्या क्रिडा स्पर्धा सुरू झाल्या पासुन उस्मानाबाद जिल्ह्याला मतिमंद प्रवर्गामधुन चॅम्पियनशिप आज तागायत मिळालेली नव्हती .  तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगांव संच. स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, विमानतळ रोड, आळणी या बालगृहातील मुलींच्या रूपाने या बालगृहातील अनाथ बेसहारा मुलींनी उस्मानाबाद जिल्हय़ाचे नाव लौकिक करून मोठ्या जिद्दीने उस्मानाबाद जिल्हासाठी मतिमंद प्रवर्गातील प्रथमच राज्यस्तरीय थर्ड चॅम्पियनशिपचे यश उस्मानाबाद जिल्हाला मिळाले.
     विजयी खेळाडूंना आमदार बच्चू कडू,.बालाजी मंजूळे  आयुक्त, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे,.नयनाताई कडू, क्रीडा उपसंचालक .प्रतिभा देशमुख  सामाजिक न्याय मंञी यांचे स्वीय सहाय्यक .गजानन वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते विजेतेपदाची ट्राॅफी प्रदान करण्यात आली.
       सन्माननीय जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले  अपंग विभागाच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यां साधना कांबळे, सहाय्यक सल्लागार,सुभाष शिंदे तसेच संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण, मुख्याध्यापक गुरुनाथ थोडसरे व क्रीडा शिक्षक वैशाली पोकळे,दासरवार,अमोल व्हनाळे व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
       तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगांव संच. स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, विमानतळ रोड, आळणी या बालगृहातील अनाथ मतिमंद मुलींचे जिल्हय़ातील दिव्यांग शाळांचे सन्माननीय संस्था प्रतिनिधी, सन्माननिय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वानी केले.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆