महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनाच्या विभागीय अध्यक्षपदी मधुकर अनभूले यांची तिस—यांदा निवड झाल्याबददल मित्रमंडळाच्या वतीने सत्कार:
रिपोर्टर:एकमेव मान्यताप्राप्त महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनाच्या वतीने २०१९  ची  वार्षिक सर्वसाधारण सभा उस्मानाबाद ये​​थे घेण्यात आली.यावेळी सलग ​दोन वर्षे कामगारांच्या आडचणी सोडवुन कामगारांचे प्रश्न मार्गी लावणारे मधुकर अनभूले यांची सलग तिस—यांदा महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनाच्या विभागीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्या बददल भुम,परंडा, वाशी मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.