उस्मानाबाद येथिल एकता फाउंडेशनला जिल्हा युवा मंडळ पुरस्कार:


     रिपोर्टर: जिल्ह्यामध्ये सातत्याने समाजपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या एकता फाउंडेशन उस्मानाबादला युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा केंद्र यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय जिल्हा युवा मंडळ पुरस्कार शुक्रवार दिनांक 22 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे  यांच्या शुभ हस्ते शाल, हार, सन्मानचिन्ह, सन्मानपञ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
          एकता फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण, एक कुटुंब - एक वृक्ष,वृक्षरोपणासाठी विविध संघटना व मित्रमंडळ वृक्ष भेट, आरोग्य शिबिर, महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन वाटप व प्रशिक्षण, शिक्षणरत्न पुरस्कार, मोफत चष्मे वाटप, इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा, स्वच्छता आभियान अशा एक ना अनेक उपक्रमाचे संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात येत असते. या सर्व सामाजिक कामाची दखल घेत सन 2017-2018  चा जिल्हा युवा मंडळ पुरस्कार एकता फाऊंडेशन उस्मानाबाद या संस्थेला देऊन गौरविण्यात आले.
          यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक मा. धनंजय काळे व मा. विकास कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. एकता फाउंडेशन च्या वतीने अमित कदम, महेश पवार,  विशाल थोरात, आभिलाष लोमटे,  मुंडे, आदित्य लगदिवे यांनी पुरस्कार स्वीकारला.