रिपोर्टर: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू ( आण्णा ) पाटील माध्यमिक विद्यालय येथे महिला मेळाव्यात हळदी -कुंकू कार्यक्रम विविध स्पर्धानी संपन्न चिवरी येथे दत्तू आण्णा पाटील माध्यमिक विध्यालयात हळदी कुंकू या कार्यक्रमानिमित्त महिला साठी संगीत खुर्ची ,उखाणे ,गाणी, तर विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन सादरीकरण केले. सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांना वंदन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यालयाच्या श्रीमती बिराजदार प्रमुख पाहुणे संस्था अध्यक्ष सौ मनिषाताई पोपटराव पाटील माझी सरपंच सौ.सुज्ञानताई पाटील व गावातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक श्रीमती बिराजदार यांनी केले.सौ.मनिषाताई पाटिल यांनी मार्गदर्शन केले तर सुत्रसंचलन सौ.ढगे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.