
संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उस्मानाबाद अंतर्गत संकल्प विदयार्थी ग्रुप पुणे यांच्या वतीने गरजू व्यक्तींना मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातुन पिपरी चिंचवड येथील आकुर्डी, काळेवाडी, वाकड, हिंजवडी, रावेत, देहू, थेरगाव याठिकाणी अन्नदान करण्यात आले.
पिंपरी चिंचवड मधे शिकायला असलेल्या विद्यार्थ्यानी शिकत शिकत गरीब लोकाना, मदत करण्याचा उपक्रम हाती घेवुन सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिळून हा उपक्रम राबवला आहे. कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यानी खूप परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला. त्यासाठी संस्थेचे सचिव प्रकाश स्वामी, उपाध्यक्ष भुसारे यांनी मार्गदर्शन केले.