उस्मानाबाद जिल्हयात जुगार अडयावर छापे 93 हाजाराचा चा माल जप्त: आठजनावर गुन्हा नोंद:



रिपोर्टर: उस्मानाबाद येथिल आनंद नगर भागात आबासाहेब गोपाळराव रायबाण आनंदनगर याने बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त्‍ पैशाचे आमीष दाखवुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळुन आला त्याचे कब्जात कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 2,140 रु.,1 मोबाईल  1,000/- असा एकुण 3,140 रूपयाचा  माल पकडण्यात आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 25.02.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे  कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई विशेष पोलीस पथक, उस्मानाबाद यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन भुम :-  1) प्रविण मुरलीधर पंडीत 2) वासुदेव गाढवे दोघे रा. भुम यांनी कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 18,000 हाजार रूपये 1 मोबाईल 2,000/- असा एकुण 20,000 रूपयाचा चा माल मिळुल आला आला आसुन  त्यांचे विरुध्द दिनांक 25.02.19 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन भुम यांनी केली असुन प्रवीण मुरलीधर पंडीत यास अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन वाशी :-   दहिफळ शिवारातील शेत गट नं 101 ब मध्ये चिंचेच्या झाडाखाली 1) रमेश आश्रुबा बोचरे 2) विकास त्रिंबळ शिंगोटे 3) सुदाम बाबासाहेब सातपुते तिघे रा. दहिफळ 4) आयुब अमर पठाण रा. पारगाव व इतर दोन हे बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी  तिरट नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आले त्यांचे कब्जात तिरट जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 2,980/- रु. ,3 मोबाईल . 7,000/- रु. 2 मोटारसायकल 60,000/- रु. असा एकुण 69,980/-रु. चा माल मिळुल आला. म्हणुन त्यांचे विरुध्द दिनांक 25.02.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे  कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन वाशी यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन आंबी :-  कुक्कडगाव मधुन खंडेश्वर वाडी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत लिंबाच्या झाडाखाली सुभाष बळीराम जाधव रा. आंबी याने बेकायदेशीर  जुगार खेळत व खेळवित असताना मिळुन आला त्याचे कब्जात कल्याण जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 360/-  एकुण 365/-रु. चा माल मिळुल आला. म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 26.02.19 रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे मजुका चे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन आंबी यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.