माढा येथिल साई पब्लिक स्कूल मध्ये बक्षिस वितरण कार्यक्रम:


 रिपोर्टर: ज्ञानदिप सुपर फास्ट अबॅकस चा रविवार दि.13.1.2019 ला साई पब्लिक स्कूल माढा येथे बक्षिस वितरण कार्यक्रम झाला. माढयामधून या परीक्षेसाठी 56 विद्यार्थी बसले होते.त्यापैकी 37 विद्यार्थ्यांना गोल्ड मिडेल, 12 विद्यार्थ्यांना सिल्व्हर मिडेल व 7 विद्यार्थ्यांना ब्रॉन्झ मिडेल मिळाले.प्रा. वैजिनाथ दळवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले माढा व आसपासच्या गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी यामध्ये होते. गेली 3 वर्ष झाले माढयामध्ये अबॅकस चे क्लास चालू आहेत. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माढा कोर्टाचे न्यायाधीश शाहनवाज सय्यद  तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माढयाचे नगराध्यक्ष सौ. मिनल ताई दादासाहेब साठे उपस्थित होते. अबॅकस चे महाराष्ट्र राज्य डायरेक्टर प्रा मल्लीकार्जुन घुमे सर तसेच प्राचार्या सौ.गीता घाडगे मॅडम , प्राचार्या सौ. काळे मॅडम, प्राचार्य श्री .इंगळे सर , नगरसेविका बंडगर ताई कार्यक्रमास उपस्तिथ होते.सुत्रसंचालन प्रा जाधव तर  आभार प्रदर्शन सौ जाधव  यांनी केले.