वृक्षांचे महत्व पटविण्यासाठी अहिल्या सखी मंचने लुटले रोपाचे वाणरिपोर्टर: अहिल्या सखी मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात वृक्षांचे महत्व पटविण्यासाठी रोपाचे वाण लुटण्यात आले. रविवार दि. २७ जानेवारी रोजी हॉटेल जत्रा येथे झालेल्या या कार्यक्रमास धनगर समाजातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात विविध स्पर्धा ही घेण्यात आल्या.


प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी  अहिल्या सखी मंचच्या अॅड.सौ.विद्या मनिष वाघमारे यांनी अहिल्या मंच या संघटनेच्या स्थापनेचा उद्देश सांगून भविष्यात समाजातील महिलांचे सबलीकरण करण्यासाठी मंच सक्रिय राहणार आहे, असे सांगितले. यावेळी सौ.देवकते यांनी नेहमीच दुष्काळाची स्थिती असल्यामुळे  मोठया संख्येने वृक्षतोड होत आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अहिल्या सखी मचने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात रोपाचे वाण लुटण्याचे ठरवले. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासोबतच महिला व मुलींसाठी संगित खुर्ची, सेल्फी गेम आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सौ.सुशिला दिंगबर मैंदाड, सविता मुकूंद पाटील, अशलेषा पांढरे, तेजस्वनी गाडे, मेघा अमर होळकर, प्रियंका हेमंत सावंत, सोनाली शैलेद्र सोनटक्के, सान्वी संजय देवकते यांनी स्पर्धेत यश प्राप्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्या सखी मंचच्या सदस्या डॉ. विद्या नवनाथ गाडे, विद्या दिनेश बंडगर, स्वाती गजानन वैद्य, निता कपील सोनटक्के, उषा सोमनाथ लांडगे, सोनाली दिनकर होळकर, निर्जला श्रीकांत तेरकर, लक्ष्मी संजय देवकते आदींने परिश्रम घेतले.