जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्राचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते लोकार्पण:
रिपोर्टर:रूपेश डोलारे 
तुळजापूर तालुक्यातील मोजे जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य वर्धिनी केंद्राचे लोकार्पण जळकोट रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष श्री. महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते व सभापती श्री. शिवाजीराव गायकवाड व जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रकाश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
   उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पाच आरोग्य केंद्राच्या या आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी निवड झाली असून , त्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील एकमेव जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.
     उस्मानाबाद जिल्ह्य़ात जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वात जास्त महिला प्रसूती होत असते आणि सर्व रुग्णांना समाधानकारक उपचार मिळत असतात त्याबद्दल यावेळी बोलताना सर्व मान्यवरांनी आरोग्य केंद्राचे व डॉ. पिनाटे साहेब यांचे कौतुक करुन सर्वांचे अभिनंदन केले. 
    यावेळी बोलताना महेंद्र धुरगुडे यांनी जळकोट आरोग्य केंद्राचे मेडिकल अॉफिसर डॉ. पिनाटे साहेब यांच्या सह त्यांच्या सर्व सहकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करुन त्याच्या कार्याचे कौतुक केले. आणि उपस्थित सर्वांना तिळगुळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
     यावेळी जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ. वडगावे साहेब , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अन्सारी, डॉ. पिनाटे साहेब , डॉ. परळीकर साहेब , डॉ. पटवारी साहेब , यांच्यासह आशा वर्कर्स व आरोग्य केंद्राचे डॉक्टर व कर्मचारी आणि ग्रामस्थ , पञकार उपस्थित होते.