साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचा उपक्रम हा सर्वांसाठी ठरणार प्रेरणादायी - जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप

.

कळंब येथे दर्पण दिनानिमित्त संपादक पत्रकार यांचा सपत्नीक करण्यात आला सत्कार 

उस्मानाबाद/ रिपोर्टर:
कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात आयोजित दि ६ जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून कळंब येथे मोहेकर महाविद्यालयाच्या सभागृहात  राज्यातील दैनिक, साप्ताहिक, मासिक,त्रैमासिक, दूरचित्रवाहिनी च्या संपादक पत्रकारांचा शाल,ट्रॉफी, डायरी,पेन,देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप म्हणाले की साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार  संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम हा सर्वा साठीच प्रेरणादाई ठरणार आहे . यावेळी बोलताना त्यांनी दैनिकांनी साप्ताहिकांना छोटे न समजता तेही आपल्या तुलनेचेच काम करत असल्याबाबत सुनावले . तसेच साप्ताहिक संघाच्या स्तुत्य उपक्रमास पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शंभराहुन अधिक संपादक, दूरचित्रवाहिनी पत्रकार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच मनोज सानप , डॉ . अशोकराव मोहेकर डॉ . संदीप तांबारे , मुक्ता पेटकर प्रा. डॉ . बाळकृष्ण भवर प्राचार्य डॉ . सुनिल पवार, हभप महादेव महाराज आडसुळ , मेजर मोहन ओव्हाळ ,  सतिश टोणगे , सुनिल देशमुख , जेष्ठ पत्रकार अविनाश गायकवाड ,गणेश शिंदे, शिवाजी कांबळे ,आदिचां यावेळी विशेष सन्मानाही पत्रकार संघाची ट्रॉफी , शाल , पेन , डायरी देवून करण्यात आला .दंडेवाड बळीराम जवळा खुर्द, बिक्कड राजेंद्र पाथर्डी यांना आदर्श मुख्याध्यापक तर पाटील गजानन कळंब, मोहिते लक्ष्मण कळंब , पवार लता कळंब, शिंदे अनिल हिंगणगाव ,सय्यद अब्दुल रांजणी , जमाले बाळासाहेब तडवळे, धायगुडे जगन्नाथ तडवळे , भागवत शिवदास अणदूर यानांआदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याबद्दल पत्रकार संघाचे सन्मानपत्र ट्रॉफी शाल देवून सन्मान करण्यात आला.    सामाजिक ,शैक्षणिक ,बेघर वासीयांना हक्काची जागा गावचा विकास या कार्याबद्दल दीपक भाऊ ताटे यांना जनसेवक या पुरस्कारने शाल , ट्रॉफी , सन्मान पत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. समाजसेवक देवदत्त मोरे यांना त्यांच्या बहुजनाच्या समाजिक कार्याबद्दल बहुनजण भुषण हा पुरस्कार  साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघाचे संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण शिंदे , मंजूषा शिंदे , उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सचिव महेबुब फकीर , सहसचिव नरसिंग खिचडे , सदस्य , शरद आडसुळ, बाळासाहेब साळुंखे , सतिश केजकर , सुनिल देशमुख , संपादक संघाचे जिल्हाअध्यक्ष सोमनाथ बनसोडे यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले . यावेळी ,व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, समाजसेवक देवदत्त मोरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ ताटे, डॉ .अशोकराव मोहेकर, डॉ संदीप तांबारे, मुक्ता पेटकर , प्राचार्य डॉ . सुनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पत्रकार संघाचे प्रदेशअध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी संघाची वाटचाल, संपादक पत्रकारांप्रती कार्य , पुढील काळातील भूमिका मांडली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे पदाधिकारी
 महेबूब फकीर, शरद आडसूळ, पांडुरंग मते,नरसिंग खिचडे, बाळासाहेब साळुंखे, सुनिल देशमुख , सतिश केजकर जिल्हाध्यक्ष सोमनाथ बनसोडे यांनी परिश्रम घेतले  यावेळी राज्यातील, जिल्ह्यातील पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल वाघमारे यांनी केले तर आभार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ बनसोडे यांनी मानले.