गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १७६ जागा:



रिपोर्टर: गेल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ अभियांत्रिकी आणि अधिकारी पदाच्या एकूण १७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 वरिष्ठ अभियांत्रिकी पदाच्या ९४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नोलॉजी/ पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मॅकेनिकल/ प्रोडक्शन/ प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग/ सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ पर्यावरणीय/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवीधारक आणि किमान १ वर्ष अनुभव असावा.

विविध अधिकारी पदाच्या ८२ जागा
शैक्षणिक पात्रता – (a) उमेदवार ६५% गुणांसह अग्निशामक इंजिनिअरिंग पदवीधारक आणि १ वर्ष अनुभव असावा. (b) उमेदवार ६५% गुणांसह केमिकल/ मॅकेनिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ आयटी/ मेटलर्जी/ टेलीकम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग पदवीधारक आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (c) उमेदवार ६५% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा एमबीए आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (d) उमेदवार ६०% गुणांसह सीए/ आयसीडब्ल्यूए किंवा बी.कॉम. किंवा एमबीए आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (e) उमेदवार ६०% गुणांसह पदवीधरसह एमबीए/ एमएसडब्ल्यू आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (f) उमेदवार ६०% गुणांसह एलएलबी आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (g) उमेदवार ६०% गुणांसह पदवीधर/ पदव्युत्तर पदवी (Communication / Advertising and Communication Management/ Public Relations/ Mass Communication/ Journalism) आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (h) उमेदवार एमबीबीएस, डीजीओ, डीसीएच डिप्लोमा आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (i) उमेदवार ६०% गुणांसह एम.सी.(रसायनशास्त्र) आणि ३ वर्षे अनुभव धारक असावा. (j) उमेदवार ६०% गुणांसह हिंदी साहित्य इंग्रजी
विषयासह पदवीधर असणे आवश्यक आहे आणि २ वर्षे अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – ३१ डिसेंबर २०१८ रोजी उमेदवाराचे वय २८ किंवा ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष इतर मागासवर्गणीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवरांसाठी २००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)