रिपोर्टर: मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.उस्मानाबाद द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांच्या सहाय्याने व ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा यांच्या वतीने दि. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या महिनाभराच्या कालावधीत महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण देण्यात आले. सदरील ६५ प्रशिक्षणार्थी महिलांना आज दि.१६/०१/२०१९ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा येथे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मा.सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच तथा जिल्हा बँकेचे संचालक विकास बारकूल, जि.प.सदस्य मदन बारकूल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवाजी बाराते, उपसरपंच सौ.वनमाला बारकूल, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.एन.एम.विजयकर, स्टेट बँकेचे व्यवस्थापक श्री.मंगेश वेदपाठक, दशरथ जाधव, विक्की वाघमारे, तबस्सुम सय्यद, वनमाला कळसाईत, छाया मोहिते तसेच मिटकॉनचे चव्हाण यांच्यासह गावातील नागरिक व महिला भगिनी उपस्थित होत्या.