जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांनीच केले हाळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन: साडेचारशे महीलांची उपस्थिती:

रिपोर्टर: जि.प.प्रा.शा.पिंपळगाव (लिं) व ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव  यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू व तिळगूळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
🌹सर्वप्रथम क्रांतीजोती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
🌹उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
🌹प्रास्ताविकात श्री.मोळवणे सर यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन उपस्थित सर्व महिलांचे उदबोधन केले.
🌹विषयसाधन व्यक्ती श्रीम.चव्हाण व श्रीम.लिके  यांनी अतिशय सुंदर शब्दात उपस्थित महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
🌹हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त उपस्थित महिलांचा संगीत खुर्ची हा खेळ घेऊन प्रथम,द्वितीय व त्रतीय क्रमांक आलेल्या महिलांना स्टील डब्बे बक्षीस म्हणून देण्यात आले.
🌹हळदी कुंकू कार्यक्रमाचे खास आकर्षण होते ते म्हणजे लकी ड्रॉ
🌹लकी ड्रॉ मध्ये अनुक्रमे प्रथम,द्वितीय,त्रतीय व चतुर्थ अशा पद्धतीने लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून अनुक्रमे पैठणी व तीन स्टील डब्बे बक्षीसे म्हणून देण्यात आली.
🌹शाळेत घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेत क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.