भुम,परंडा,वाशी तालुक्यासह जिल्हयातील बेरोजगारीवर काम करणे गरजेचे:शंकरराव बोरकर


रिपोर्टर: उस्मानाबाद जिल्हयातील बेरोजगारीवर काम करूण बेकारांच्या हाताला काम मिळवुन देणे ही उस्मानाबाद जिल्हयातील राजकीय मंडळी पुढील आवहान आहे.त्यासाठी जात,धर्म,पक्ष विसरूुन संगळयांनी एकत्र यवुन काम करणे गरजेचे आहे.आसे मत रेल्वे बोर्डाचे सदस्य शंकरराव बोरकर यांनी व्यक्त केले.भुम,परंडा,वाशी मित्रमंडाळाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या रत्न पुरस्कार सोहळयात ते बोलत होते. 

उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळयाला
आमदार राणाजगजितािंह पाटील,आमदार राहुल मोटे,आमदार सुजितसिंह ठाकुर,डॉ,प्रतापसिंह पाटील आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बोरकर म्हणाले की जिल्हयासह भुम,परंडा,वाशी या तालुक्याच्या ठिकानी वाढलेली बेकारी उदयोगाच्या माध्यमातुन मी लवकरच कमी करणार आसुन उदयोग क्षेत्रातील नामांकीत कंपण्याला काही उदयोग उस्मानाबाद जिल्हयात उभे करावेत आशी मागणी केली आसल्याची माहीती शंकरतात्या बोरकर यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली.शुन्यातुन विश्व कसे उभा करायचे आणि आपन स्वत: आपले भविष्य कसे घडवायचे या विषयी बोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी स्वात:मी कसा घडलो ही सांगण्यास सुध्दा ते विसरले नाहीत.     
उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या रत्न पुरस्कार सोहळयामध्ये सुर्यकांत सुखदेव भोईटे यांना कृषी रत्न पुरस्कार, अरूणराव आनंदराव भराटे यांना व्यापार रत्न पुरस्कार, बाळासाहेब ज्ञानदेव पडघण यांना क्रिडा रत्न पुरस्कार,ओएसिस मिल्क गिरवली यांना उदयोगरत्न पुरस्कार, उपजिल्हाधिकारी रामचंद्र सुखदेव चोबे यांना प्रशासन रत्न पुरस्कार,वैभव एकनाथ बेलसरे यांना कलारत्न पुरस्कार,  विर भगतसिंग अकॉडमी ईट यांना समाजरत्न पुरस्कार,जगदाळे मामा शिक्षण संस्था वाशी यांना शिक्षण रत्न पुरस्कार तर भुम तालुक्यातील पाटसांगवी ग्रामस्त आणि परंडा तालुक्यातील लगोंटवाडी ग्रामस्त यांना पाणी फाउंडीशन या कामाबददल विशेष पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमादउरम्यान ठेवण्यात आलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमाने सर्व मान्यवरांचे लक्ष वेदुन घेतले.