सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडची सुरेल मैफिल एक फेब्रूवारीला उस्मानाबादमध्ये: रिपोर्टर:
झी वाहिनीवरील सा रे ग म प विजेती कार्तिकी गायकवाड, गौरव महाराष्ट्राचा विजेता कौस्तुभ गायकवाड तसेच पंडित कल्याणजी गायकवाड यांची सुरेल मैफिल वर्षाराणीज एंटरटेनमेंट द्वारा शुक्रवार दिनांक 1 फेब्रुवारी  2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगर परिषद उस्मानाबाद या ठिकाणी सायंकाळी ठिक 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हास्ते होणार आसुन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ,मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणुन जिप अध्यक्ष नेताजी पाटील,मकरंद राजे निबांळकर,अतिरिक्त पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांची उपस्थिती राहणार आहे.   
 उस्मानाबाद मधील नागरिकांसाठी हि एक अनोखी संगीतमय मेजवानी ठरणार आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या गीतरचना सादर करण्यात येणार असून उस्मानाबाद मधे पहिल्यांदाच निःशुल्क होणाऱ्या अश्या आगळ्या वेगळ्या संगीत मैफिलीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.