तेर,ढोकी,तडवळे आणि येडशी या चार गावच्या पाणी प्रश्नासाठी ढोकी चौकात ग्रामस्ताचे रास्ता रोखो आंदोलन:रिपोर्टर: उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, कसबे तडवळे, आणि येडशी या चार गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभाग व जिल्हा परिषद प्रशासन यांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी आज(२४) ढोकि येथील चौकात ग्रामस्ताच्या वतिने जवळपास दिडतास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे थकीत असलेले वीजबिल भरण्यासाठी १७ जानेवारी रोजी शासनाने निधी दिला असून देखील जिल्हा परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. 
राजकीय आकसापोटी जिल्हा परिषद प्रशासन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये या चार गावचा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी  दुर्लक्ष करत आहे . 
याबाबतीत जिल्हा परिषद प्रशासन व प्राधिकरण विभाग यांचे लक्ष वेधण्यासाठी एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील व चार गावचे सरपंच किरण आवटे , महादेव खटावकर, नाना चव्हाण ,गजानन नलवडे अमोल समुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर बार्शी राज्य मार्ग क्रमांक ७७ वर रास्ता रोको करण्यात आला . जवळपास दीड तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनासाठी चारही गावातून हजारो नागरिक उपस्थितीत होते .
प्राधिकरणाची तेरणा धरणावर असलेली पाणीपुरवठा योजना जर चालू झाली तर जवळपास ८५००० नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे .