जिल्हयातील आकरा शिक्षण संस्थेला अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजना बाबत शिक्षणाधिका—याच्या नोटीसा:

पैशाच्या लालचेपोटी संस्थापकांनी थांबवले शिक्षकांचे समायोजन: 

रिपोटर: शासन निर्णय आॅक्टोबर 2017 नुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे आदेश संस्थापकांनी न पाळल्याने माध्यमिकचे 11 शिक्षक अतिरिक्त आहेत.पैशाच्या लालचेपोटी शिक्षकांना सेवेत सामावुन घेण्यासाठी संस्थापक टाळाटाळ करत आसल्याने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी जिल्हयातील 11 संस्थापकाला नोटीसा दिल्या आसुन 3 जानेवारी पर्यत अतिरिक्त शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत.

शैक्षणीक वर्षे 2017—18 च्या संच मान्यतेनुसार खाजगी शैक्षणीक संस्थेच्या अनुदानीत माध्यमीक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांना संस्थापकांनी सेवेत सामावुन घेणे बंधनकारक आसताना आदयाप ही या शिक्षकांना रुजू न करूण घेतल्याने अतिरिक्त शिक्षक सेवेपासुन वंचित आहेत.परंतु महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियामावली 1981 मधील तरतुदीनुसार अतिरिक्त शिक्षकास 3 जानेवारी रोजी पर्यत शाळेत समायोजीत करूण घेण्यात यावा आन्यता संस्थेवर कारवाई केली जाईल आशा प्रकारे दिलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. नोटीसा दिलेल्या संस्थामध्ये श्री सिध्देश्वर विदयालय कसगी त:उमरगा   ,हारीभउ घोगरे हायस्कुल माकडाचे उपळे त:उस्मानाबाद ,छत्रपती शिवाजी विदयालय उस्मानाबाद,श्रीपतराव भोसले हायस्कुल उस्मानाबाद,नरेद्र आर्य विदयामंदीर अपसिंगा त्: तुळजापुर,जय हनुमान विदयालय वाटेफळ त:भुम,पार्वती कन्या प्रशाला जळको त: तुळजापुर,अंतरगाव हायस्कुल अंतरगाव त:भूम,गुरूदेव दत्त हायस्कुल भूम,श्री संत विदयामंदीर लोणी,ता:परंडा प्रतिभा निकेतन विदयामंदीर मुरूम त:उमरगा जिल्हयातील या आकरा संस्थेला नोटीसा दिल्या आहेत.शासनचे आदेश आसतानासुध्दा आम्हाला पैशाच्या लालचेपोटी         
 समायोजन करूण घेतले जात नाही आशी माहीती सदर अतिरिक्त शिक्षकांनी महाराष्ट्र लाईव्ह शी बोलताना दिली.