रिपोर्टर: गतवर्षी यवतमाळ जिल्हयामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी घडलेल्या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सिजेंटा इंडिया लि. कंपनी यांच्याव्दारे डॉक्टरांचे प्रशिक्षण या कार्यक्रमामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी संरक्षण कीट वापरणे गरजेचे आहे त्याबरोबरच डॉक्टरांनी सुद्धा प्रशिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.
कीटकनाशक फवारणी काळजी व संरक्षण जनजागृती कार्यक्रम 105 गावांमध्ये,5000 संरक्षण कीट, शेतकरी समुपदेशन,100 भिंतीचित्र , प्रबोधन गाडी,300 डॉक्टर प्रशिक्षण इ. उपक्रम सिन्झटा इंडिया लि. याद्वारे करण्यात आले आहेत,अशी माहिती डॉ. के.सी.रवी उपाध्यक्ष,उद्योग स्थिरता दक्षिण आशियाई सिझेन्टा कंपनी यांनी दिली.तसेच डॉ. व्ही. व्ही. पिल्ले, विषबाधा प्रतिबंधन तज्ञ प्रशिक्षक म्हणून लाभले. कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्यानंतर डॉक्टरांनी निदान करण्याच्या विशेष पद्धती विषयावर या तज्ञांकडून जिल्ह्यातील डॉक्टरांना विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हा प्रशिक्षण कार्यक्रम शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सभागृह, उस्मानाबाद येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे , उपसंचालक आरोग्य डॉ. एकनाथ माले, डॉ. प्रकाश खापर्डे, अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,डॉ. आदिनाथ राजगुरू, डॉ. प्रदीप कावरे,सिजंन्टा कंपनीचे श्री.वरूण गोयल, रूग्ण समितीचे अब्दुल लतीफ यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवार संसदेचे विनायक हेगाणा यांनी केले व सुरेश राजहंस यांनी आभारमानले.या कार्यक्रमासाठी निमा डॉक्टर संघटना, आय एम ए डॉक्टर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय डॉक्टर व विद्यार्थीउपस्थित होते व सिजंटा इंडिया लि. कंपनीचे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शिवार फौंडेशनचे विशेष सहकार्य मिळाले.