कळंब महसूल मंडळातील समाधान योजनेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

. रिपोर्टर: शहरातील मोहेकर कॉलेजमध्ये आज दि.6 जानेवारी 2019 वार -रविवार रोजी महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शिबिराचे उद्घाटन डॉ .अशोकराव मोहेकर, नायब तहसीलदार रविराज जाधव यांनी केले .आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा . सुधीर (आण्णा ) पाटील , महाराष्ट्र शासन, केंद्रशासन व तहसील कार्यालय ,कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे . नीतिमूल्य आयोगाच्या मूल्यांकनानुसार उस्मानाबाद जिल्हा हा देशातला तीन नंबरचा मागास जिल्हा म्हणून घोषित झाला आहे . नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे म्हणून मा . सुधीर (आण्णा )पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळांमध्ये समाधान शिबीर राबवायचे ठरवले आहे . कळंब तालुक्यातील त्याचा आज पहिला दिवस .याप्रसंगी नायब तहसीलदार जाधव यांनी "लोकांनी समाधान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले व प्रशासन  सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले "डॉ . अशोकराव मोहेकर यांनी "शिबिर राबवित असल्याबद्दल सुधीर (आण्णा ) पाटील यांचे आभार मानले . त्याप्रसंगी महसूलच्या नायब तहसीलदार शोभा कुलकर्णी, मंडळाधिकारी मडके टी .डी .,बिक्कड एस . एस . तलाठी सिरमोड एम.डी. भातलवंडे पी.टी.बडूरे बि.के. सिद्धार्थ बनसोडे ,गोरक्षनाथ जावळे स्थानिक कार्यकर्ते शितल गायकवाड, स्वप्नील पाटील ,लोमटे  विठ्ठल ,कानडे हुकुमचंद, अमित लोमटे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले  सूत्रसंचालन के.पी.पाटील यांनी केले