
रिपोर्टर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
चालक तथा वाहक पदाच्या एकूण ४४१६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह अवजड वाहन चालविण्याचा परवाना सोबतच चालक आणि वाहक दोन्हींचा आरटीओ बिल्ला तसेच ३ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
सूचना – सध्या संक्षिप्त जाहिरात उपलब्ध झाली असून सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज सुरु होण्याची तारीख – १८ जानेवारी २०१९ आहे.